Saturday, July 6, 2019

नमस्कार मंडळी !

ब्लॉग लिहायचाच असं ठरवून जवळपास ४ वर्ष झालीत. गेले ४ वर्ष मी फक्त जेमतेम ४ पोस्ट लिहू शकलो . मुळातच आळशी लोकांसाठी वाचन जेवढ कंटाळवाणं त्याहून जास्त लिखाण. असो . निद्रादेवीची आराधना असं नाव दिलेला हा ब्लॉग मी पहिल्यांदा मराठी मध्ये लिहिण्यास घेत आहे. फार पूर्वी मी शाळेत असताना मराठी मध्ये एक धडा होता. निदादेवीची आराधना ! पहिल्यांदाच नाव वाचल्यावर प्रश्न पडला हि कोणती नवी देवी बुवा. नंतर धडा वाचल्यानंतर समाजाला कि झोप येण्यासाठी केलेले प्रयन्त म्हणजेच निद्रादेवीची आराधना.

बरोबर. आकलनशक्ती तल्लेख असणाऱ्या लोकांनी हे बरोबर ओळखलंच असेल ह्या ब्लॉग चा नाव निद्रादेवीची आराधना का आहे ! तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे . झोप येत नसतात झोप यावी म्हणून केलेला उपद्यव्याप म्हणून ब्लॉग लिहिण्याची सुबुद्धी  सुचली . (आता खरा सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी दुर्बुद्धी :P ). झोप येत नाही हा फक्त मलाच होणार त्रास आहे अस वाटत असताना मला कळलं कि आजकाल हा त्रास खूपच mainstream आहे. अनियमित  कार्यालयीन वेळा (ज्याला flexible टाईमिंग असा म्हणतात ) बदलती जीवनशैली , IT मधला उशिरा ऑफिस मधे थांबून काम करण्याची पद्धत ह्यामुळे रात्री झोपण्याच्या वेळा लांबतात . उशिरा झोपलं कि उशिरा उठणं आपसूकच . मग उशिरा ऑफिस, उशिरापर्यंत दुसऱ्या देशातल्या बॉस बरोबर केलेल्या मिटींग्स ह्यामुळे हे चक्र सुरूच राहता. माझ्या बाबतीत बोलायचं झाला तर अविवाहित, घरापासून दूर राहताना घड्याळाच्या काट्यांपेक्षा आळस नेहमीच जिंकत आलाय.

एकंदरित आज परत अशीच एक रात्र आहे . रात्रीचे २ वाजून २७ मिनिटे. झोपेची अजून काहीच चिन्ह दिसत नाहीये. अशा वेळी मी वेळ वाया घालवलेला नाही अशी मनाची समजूत घालण्यासाठी मी उघिच काहीबाही काम काढून ती करत बसतो . फाईल मधे कागदपत्र व्ययस्थित लावणे , नख साफ करणे , कपडे साफ करणे हि त्यातलीच काही काम. अगदीच काही नसला तर गूगल मॅप्स वर लोकांनी टाकलेली माहिती बरोबर आहे कि नाही हे तपासून पाहणं हाही त्यातलाच एक भाग . समाजसेवा आणि माझा संबंध हा गूगल मॅप्स सोडून फारसा कुठे दुसरीकडे आलेला ठेवत नाही .

चला. आता सकाळी गुडलक मध्ये ब्रेकफास्ट करूनच झोपावं म्हणतो.
आळस आडवा आला. बाकीचं नंतर लिहिले म्हणतो . 

No comments:

Post a Comment